मुंबई

Shahajiraje Bhosale Arrested : भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी! ठेकेदार कंपनीच्या अभियंत्याला मारहाण ; शहाजीराजे भोसले अटकेत

•12 टक्के कमिशन न दिल्याने प्रकल्पात गोंधळ; साहित्याची तोडफोड, मोबाईल व रोख रक्कम हिसकावली

कर्जत | महावितरणच्या ठेकेदार कंपनीच्या स्थापत्य अभियंत्याला मारहाण, साहित्याची नासधूस आणि खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी शहाजीराजे भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत सात ते आठ अनोळखी युवकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.

राशीन येथील राजेवस्ती येथे रॅम्सन सोलर पल्स या ठेकेदार कंपनीमार्फत महावितरणचा प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पात 12 टक्के कमिशन देण्यास नकार दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडत, साहित्याची जेसीबीने तोडफोड केली. इतकेच नव्हे, तर सीसीटीव्ही कॅमेरे तोडून दोन कॅमेरे पळवले, दोन पोल पाडले आणि सुरक्षारक्षकाला धमकावले, अशी माहिती फिर्यादी वसीम नौशाद शेख (रा. भिगवण) यांनी दिली आहे.

नुकसानाच्या घटनास्थळी कंपनी अधिकारी सुनील तिवारी, रमेशकुमार सहा आणि पोलिसांसह वसीम शेख पोहोचले असता, युवराज राजेभोसले व इतरांनी पुन्हा त्या ठिकाणी येत सुनील तिवारी व रमेशकुमार यांच्यावर काठ्या, लोखंडी साखळी, रॉड, फायबर दांड्यांनी हल्ला केला.

तसेच वसीम शेख आणि सुनील तिवारी यांचे मोबाईल फोन, गाडीची किल्ली आणि रोख 25 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तक्रारही पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी शंकरराव ऊर्फ शहाजी भाऊसाहेब राजेभोसले (वय 45) याला अटक करण्यात आली असून, युवराज राजेभोसले आणि इतर अनोळखी आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. कर्जत पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक फौजदारांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago