बदलापुरातील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, गोंधळानंतर आरोपीला अटक, बदलापूर मध्ये रेल्वे रोको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फास्टट्रॅक वर कारवाई करण्याचे दिले निर्देश
Badlapur School Rape Case : बदलापूर येथील शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी मुलींचे लैंगिक अत्याचार प्रकरणे आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. अशा नरधर्मांचा एन्काऊंटर करावा ; अविनाश जाधव
बदलापूर :- मंगळवारी सकाळी बदलापूरच्या संतप्त नागरिकांची मिरवणूक शाळेच्या गेटमध्ये घुसली. येथे नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, शाळा चालवणाऱ्या प्रशासनातील कोणीही पालकांना सामोरे जाण्याचे धाडस दाखवले नाही. शाळेच्या गेटजवळ लोकांचा जमाव जमला मात्र तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाशी याबाबत कोणीही बोलायला पुढे आले नाही.
मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या सफाई कामगाराच्या कंत्राटदाराचा करार रद्द करण्यात आला आहे. शाळेने पालकांना माफीनामा पत्र जारी केले आहे. जे घडले ते दुर्दैवी, घृणास्पद आणि निषेधार्ह असल्याचे त्यात म्हटले आहे. आरोपींविरुद्ध आम्ही आमच्या क्षमतेनुसार पोलिसांना सहकार्य केल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हणाले की सदर प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालू ठेवणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आरोपींना एन्काऊंटर करण्याची केली मागणी केली आहे.
बदलापूर शहरात एक हृदयद्रावक Badlapur School Rape Case घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत सफाई कामगाराने चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलींचे पालक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता महिला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना तब्बल 12 तास तिथे डांबून ठेवले.
राजकीय प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाल्या की, अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचे नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असे वागण्याची भिती वाटली पाहिजे, कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे, हात लावणे तर दूरची गोष्ट पण पाहताना देखील दहा वेळा विचार केला पाहिजे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेकी, मी पोलिस आयुक्तांशी स्वतः बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहे. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहे.
बदलापूरमध्ये जी अत्याचाराची घटना घटली यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, या नराधमांना डायरेक्ट मारायची वेळ आली आहे. या गोष्टीवर राजकारण करु नये, सर्वांनी या एकत्र येत याचा निषेध करावा. आशा प्रकरणातील आरोपी जर भेटले तर त्यांना ठेचायचला सुरवात आमच्यापासून होईल असे म्हणत या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल.
मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या अनेक दिवसांपासून घटनेचा पाठपुरावा करत होत्या. जे घडले ते खूपच वाईट होते. अशा मानसिकतेच्या लोकांचा एन्काऊंटर झाला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकले पाहिजे. लहान मुलींच्या अंगावर हात टाकण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
नवनीत राणा म्हणाल्या की, बदलापूरमध्ये शाळेत जे घडले त्या राक्षसाला भर चौकात फाशी द्यायला हवी आहे. आशा लोकांना काद्याची भीती राहिली नाही. मनाला खूप वेदना होत आहे, असे कृत्य करणाऱ्यांना कायद्याची भीती असायला हवी, त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे राणांनी म्हटले आहे.