Sex Racket In Navi Mumbai : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या लॉजच्या मॅनेजर आणि वेटरला अटक
•Sex Racket Exposed In Navi Mumbai अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांची छापेमारी, सात पीडित महिलांचे सुटका, पीडित महिला पश्चिम बंगाल, आसाम राज्यासह बांगलादेशातून असल्याचे पोलिसांनी दिली माहिती
नवी मुंबई :- सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नवी मुंबईतील हॉटेल सनराईज लॉजिंग,रेस्टॉरंट अँड बार, सेक्टर-1 शिरवणे गाव, नेरूळ येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी छापेमारी करून हॉटेल चालकासह, मॅनेजर आणि वेटर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Hotel Manager and Waiter Arrested in Sex Racket Operation in Navi Mumbai तसेच, सात पीडित महिलेची सुटका केली असून यात सातही महिला पश्चिम बंगाल, आसाम या राज्यसह काही महिला बांगलादेशातुन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या पथकाने छापेमारी करत या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Mysterious Sex Racket Exposed in Navi Mumbai’s Sector-1, Police Launch Investigation
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, हॉटेल सनराईज लॉजिंग, रेस्टॉरंट ॲण्ड बार येथे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली होती. Urgent News: Navi Mumbai Police Raid Hotel in Sex Racket Investigation पोलिसांनी त्वरित कारवाई करत हॉटेलमध्ये बोगस गिऱ्हाईक मार्फत सापळा रचून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मॅनेजर अवतारसिंग चारीसिंग मिस्त्री (58 वर्ष), वेटर छोटू उर्फ किशोरकुमार श्रीगणेश यादव (32 वर्ष), तसेच लॉज चालक जय रमेश शर्मा या तिघांना ताब्यात घेतले आहे. मॅनेजर साडेतीन हजार रुपये घेऊन ग्राहकांना त्या बदल्यात मुली पुरवल्या जातात या कामाच्या बदल्यात सेक्सवर्करला 500 ते हजार रुपये दिले जात असल्याची कबुली आरोपींनी केली आहे.पोलिसांनी आरोपींच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3,4,5,6 सह भारतीय न्याय संहिता कलम 143(3),3(5) अनवे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच,पुढील तपास नेरूळ पोलीस ठाणे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Navi Mumbai Police Take Down High-Profile Sex Racket in Raid on Hotel Sunrise
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई अमित काळे तसेच सहा. पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा,धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वारकर, पोलीस हवालदार अनिल मांडोळे, पोलीस शिपाई शिरीष चव्हाण, राजकिरण कोलते, महिला पोलीस नाईक सविता म्हात्रे, ज्योती अडकमोल यांनी केली आहे. From West Bengal to Assam: International Connections in Navimumbai’s Sex Racket