पोक्सो कायद्यांतर्गतील आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास; अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, ठाणे न्यायालयाचा निर्णय
Thane Latest Crime News : क्सो अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला सात वर्षाची न्यायालयीन कोठडी, यापूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली सात वर्ष शिक्षा भोगून आला होता
ठाणे :- एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार minor girl was sexually assaulted करणाऱ्या गणेश बाळाराम पाटील (41 वय,रा. साबेगाव, दिवा) या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास, तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा (विशेष न्यायालय, पोक्सो) Thane Court News न्यायाधीश दिनेश देशमुख सुनावली आहे. तसेच दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आरोपी गणेश याच्यावर यापूर्वी 2009 मध्ये आठ वर्षाच्या मुलीसोबत अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी Sexual assault न्यायालयाने सात वर्ष शिक्षा सुनावली होती. Thane Latest Crime News
2021 मध्ये आरोपी गणेश बाळाराम पाटील यांनी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर आरोपी गणेश विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी कलम 363,354,342,506 सह पोक्सो कायद्यांतर्गत कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते. पुराव्याच्या आधारे न्यायाधीश दिनेश देशमुख यांनी आरोपी गणेश याला सात वर्षाचे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीने 2009 मध्ये आठ वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सात वर्षाचे शिक्षा भोगून आला आहे. Thane Latest Crime News
सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता संध्या म्हात्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील, पोलीस हवालदार विद्यासागर कोळी मुंब्रा पोलीस ठाणे यांनी अथक परिश्रम करून न्यायालयात ठोस पुरावे सादर केले व त्यामुळे गुन्हयातील आरोपीला दोषी ठरविण्यात यश आल्यामुळे उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस दलात व समाजातील सर्व स्तरातुन पोलीसांचे कौतुक होत आहे. Thane Latest Crime News