मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महाराष्ट्र उपाध्यक्षपदाचा दबदबा वापरून मालाडच्या मालवणी परिसरात राहणारा विनोद लाड याने एका महिलेची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “मुलांना नोकरी लावतो,” असे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षांपासून अनेकांचे पैसे लाटून पसार होणाऱ्या या व्यक्तीने मनसे पक्षाच्या नावाचा गैरवापर करत अनेकांना गंडवल्याचा आरोप आहे. मुंबईकरांनो, सावध व्हा! हा व्यक्ती तुमच्या जवळपास दिसला, तर सतर्क राहा! मालवणीतील एका पीडित महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले, की विनोद लाड याने तिच्याकडून ५.५० लाख रुपये उकळले. “माझ्या मुलाला नोकरी लावतो,” असे सांगत त्याने ही रक्कम घेतली, पण आता तो फक्त “आज-उद्या” असे टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे, या महिलेचा मुलगा सध्या किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे, आणि त्याच्यासाठी पैशांची नितांत गरज आहे. तरीही, विनोद लाड याने कोणतीही मदत न करता तिला वाऱ्यावर सोडले आहे. “हा भडवा पैसे देत नाही, तर त्याने बंगड्या भरून साडी नेसून सिग्नलवर उभे राहावे किंवा स्वतःची किडनी विकून माझे पैसे परत करावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे.विनोद लाड याने मनसे पक्षाचा उपाध्यक्ष असल्याचा बडेजाव करत अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. पीडितेने सांगितले, की “मनसे हा गोरगरीब आणि मराठी माणसाचा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पण विनोद लाडसारखे लोक पक्षाच्या नावाचा वापर फक्त लोकांना लुबाडण्यासाठी करतात.” तिने अनेकांकडे मदतीसाठी हातापाया पडूनही कोणी पुढे आले नाही, अशी खंत व्यक्त केली. आता ती थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन न्याय मागणार आहे. “मला विश्वास आहे, राज ठाकरे साहेब या चोराला पाठीशी न घालता माझी मदत करतील,” असे तिने ठामपणे सांगितले.या प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली आहे. विनोद लाड याच्यासारख्या व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन पीडितेने केले आहे. “हा माणूस कुठे दिसला, तर त्याच्यापासून अंतर राखा. मी लवकरच प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्व सत्य उघड करेन आणि ज्यांनी ज्यांनी मला भेटून टाळाटाळ केली, त्यांची नावेही सांगेन,” असे तिने स्पष्ट केले. तिने मुंबईकरांना ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून इतरांना सावध करण्याची विनंती केली आहे.या प्रकरणावर मनसे पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विनोद लाड याच्यावर पक्ष कारवाई करणार का, की हा प्रकार आणखी गंभीर वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांनो, अशा फसव्या लोकांपासून सावध राहा आणि आपल्या मेहनतीच्या पैशांचे रक्षण करा!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…