क्राईम न्यूज

मालाडमध्ये खळबळ: अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या महिलेची गळा दाबून हत्या; मालवणी पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

Malad Latest Crime News : चारकोप येथे राहणाऱ्या बारबालेचा मृतदेह निर्जन जागेत आढळला

मुंबई :- मालाड पूर्वेकडील मालवणी परिसरात जुन्या चर्चजवळील एका निर्जन जागेत अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर, गळा दाबून तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मालवणी पोलिसांनी Malwani Police Station गुरूवारी हत्येचा गुन्हा (IPC कलम 302) दाखल केला आहे.

चारकोप येथील महिलेची ओळख पटली

बुधवारी (24 सप्टेंबर) जुन्या चर्चजवळील पत्र्याच्या शेडजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. Mumbai Latest Crime News

गुरूवारी दुपारी या महिलेची ओळख पटली. राणी शुक्ला (वय 40), असे तिचे नाव असून ती कांदिवलीच्या चारकोप परिसरात आई आणि 13 वर्षांच्या मुलीसह राहत होती. ती पतीपासून विभक्त झाली होती आणि पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांकडून आणि परिचितांकडून अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट

मृतदेहावर जखमेच्या खुणा स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालातून महिलेचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला.

मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की, “आम्ही परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासत आहोत. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपी याच भागातील असण्याची शक्यता आहे. लवकरच आरोपीला अटक करू.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago