9 लाख 90 हजार रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात ,काशिमीरा पोलीस ठाण्यास यश
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिमीरा पोलीस स्टेशन परीसरात राहणा-या श्रीमती. माया चक्रवती हे गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करुन फोन केला असता ओला ॲप नावाने BFK ॲप पाठविले सदरचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगुन त्याद्यारे संशयीत यांनी फिर्यादी याचे खात्यावरुन इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करुन फिर्यादी याची 31 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा भादंवीसं कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनीयमकलम 66 (सी),66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Mira Road Crime News
तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे इराले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली, प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बैंक खात्यात पळती झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी/ अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी 9 लाख 90 हजार रक्कम त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Crime News
अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी प्यावयाची काळजी…
अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एसएमएस प्राप्त झाल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देवू नये.
• आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एसएमएस, ईमेल, कॉल्स यांची विश्वासहर्ताची पडताळणी करावी.
आपले मोबाईलवर प्राप्त होणारा OTP किंवा आपली वैयक्तीक माहिती देवु नये. Mira Road Crime News
कोणतेही अनाधिकृत ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करु नये.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी. Mira Road Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस उप निरीक्षक वैभव धनावडे, पोलीस हवालदार दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…