School Bribe News : शिक्षण क्षेत्रात खळबळ, आरटीई शासनाच्या कोट्यातून ॲडमिशन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजोबांकडे मागितली लाच
ACB Arrested Group Education Officer and Contract Staff For Taking Bribe : 4.5 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या गटशिक्षणाधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी यांना एसीबीने रंगेहात पकडले आहे
परभणी :- शिक्षण क्षेत्रातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. आरटीई(right to education) या शासनाच्या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या दोन शासन अधिकाऱ्यांना एसीबीने चांगला धडा शिकवला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी कारवाई करत गटशिक्षणाधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी Group Education Officer and Contract Staff असलेल्या दोघांना लाच प्रकरणी अटक केली आहे. साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक ACB Arrested Bribe Criminal केली आहे.अशोक बापूराव सोळंके (46 वर्ष),विस्तार अधिकारी शिक्षण ( वर्ग-3 )चार्ज गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मंठा.आणि रामदास यादवराव माने (35 वर्ष ),व्यावसाय विषय तज्ञ ( कंञाटी ) गट शिक्षणाधिकारी कार्यालय, यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. Anti Corruption Bureau Latest News
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार यांच्या नातीस ब्राईट इंग्लिश स्कूल मंठा या ठिकाणी इयत्ता पहिली मध्ये ऍडमिशन घ्यायचे असल्याने तक्रार यांनी त्यांच्या नातीचा महाराष्ट्र शासनाचे पूर्व प्राथमिक प्राथमिक केंद्रीय प्रवेश प्रक्रिया RTE Act 2009 प्रमाणे फॉर्म भरल्याने तक्रारदार याचे नातीची 25 % शासकीय कोठया मधून निवड झाली. त्यानंतर तक्रारदार यांना त्यांचे नातीचे अॅडमिशन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय मंठा यांचे कडून सर्व कागदपत्रे तपासून त्याबाबत एनओसी आवश्यक असल्याने तक्रार यांनी त्यांची कागद पत्रे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल केली. त्यानंतर तक्रारदार हे गट शिक्षणाधिकारी कार्यालयात माने यांना भेटले. त्यावेळी माने यांनी तक्रारदार यांचेकडे सोळंके यांच्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना येथे दिली. तक्रारीवरून काल (27 ऑगस्ट) रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये माने यांनी तक्रार यांच्याकडे पंचा समक्ष पाच हजार रुपयांची मागणी करून सोळंके यांच्या समक्ष तडजोडी अंती 4.5 हजार रुपये लाचेची रक्कम तक्रार यांना घेऊन येण्यास सांगितले असता सापळा रचून माने यांना लाचेची रक्कम 4.5 हजारांची रुपये तक्रारदार यांचे कडून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर.बाळू जाधवर,पोलिस उपअधीक्षक ला.प्र.वि.जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर म.मुटेकर पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.जालना सापळा पथक गजानन खरात, जावेद शेख, अतिश तिडके, भालचंद्र बिनोरकर यांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे