नाशिकनाशिक
Trending

Sayaji Shinde Meet Raj Thackeray : ‘तपोवन वाचवा’ मोहिमेला राज ठाकरे यांचा पाठिंबा! – अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Sayaji Shinde Meet Raj Thackeray :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करण्याची दर्शवली तयारी; मोहिमेची व्याप्ती वाढवण्यावर बैठकीत चर्चा

मुंबई :- नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वृक्षतोडी विरोधातील ‘तपोवन वाचवा’ मोहिमेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळाला आहे. आज (8 डिसेंबर) प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे Sayaji Shinde यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांची विशेष भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर देखील उपस्थित होते. Nashik Forest Cutting Lav Latest News

या महत्त्वाच्या बैठकीत तपोवन परिसरातील जैवविविधतेचे रक्षण, पर्यावरणाचे जतन आणि स्थानिकांच्या सहभागाने ही मोहीम अधिक व्यापक कशी करता येईल, यावर सखोल चर्चा करण्यात आली.
राज ठाकरे यांनी ‘तपोवन वाचवा’ मोहिमेबद्दल सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

यामुळे नाशिकमधील वृक्षतोड थांबवण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मनसेच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने यापूर्वीच तपोवन येथे आंदोलन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0