देश-विदेश
Trending

Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

Satyapal Malik : दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; दीर्घकाळापासून होते किडनीच्या विकाराने त्रस्त

ANI :- जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि राजकारणातील एक प्रमुख चेहरा असलेले सत्यपाल मलिक Satyapal Malik यांचे आज निधन झाले. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते.

माहितीनुसार, सत्यपाल मलिक यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना 11 मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

1974 मध्ये बागपत येथून विधानसभा निवडणूक लढवून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. एक परखड आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून त्यांची ओळख होती. जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व हरपले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0