पुणे

Satish Patil On Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना पक्षात घेतले ही मोठी घोडचूक केली आमदार सतीश पाटील यांचे विधान

•Satish Patil On Eknath Khadse एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून प्रतिक्रिया येऊ लागले आहे

पुणे :- एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन मोठी चूक केल्याची कबुली पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केला आहे. खडसे यांनी नुकतीच भाजपमध्ये परतण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचा शरद पवार गट व सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांत खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी खडसेंच्या बाबतीत आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे. Satish Patil On Eknath Khadse

एकनाथ खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच्या वादामुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पवारांनी खडसेंना विधान परिषदेवरही संधी दिली. आता खडसे पुन्हा भाजपत जात असल्यामुळे शरद पवारांनी पुण्यात आयोजित बैठकीत खडसेंना पक्षात घेऊन आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे, असे डॉक्टर सतीश पाटील यांनी सांगितले आहे. Satish Patil On Eknath Khadse

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास आम्ही तीव्र विरोध केला होता. त्यांना पक्षात घेऊन काहीच फायदा होणार नाही असे आम्ही म्हणालो होतो. ही बाब आम्ही‌ शरद पवारांच्याही कानावर घातली होती. तसेच खडसेंना आमदारकी देण्याऐवजी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला‌ आमदार करावे असा आग्रहही आम्ही धरला होता. आता खडसेंविषयी घेतलेला निर्णय आपली मोठी चूक होती हे पवार साहेबांनी मान्य केले आहे, असे सतीश पाटील म्हणाले. Satish Patil On Eknath Khadse

काय म्हणाले सतीश पाटील
माध्यमांशी बोलताना डॉ. सतीश पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आम्ही विरोध केला होता. त्यांना घेऊन पक्षाच्या काहीच फायदा होणार नाही, हे आम्ही शरद पवार यांना सांगितले होते. तसेच त्यांना आमदारकी देण्याऐवजी पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना आमदार करावे, असेही म्हटले होते. खडसे बाबत घेतलेला हा निर्णय म्हणजे आपली मोठी चूक होती, हे पवार साहेबांनी आता मान्य केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले. Satish Patil On Eknath Khadse

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0