ठाणेमुंबई
Trending

Mumbai Railway Local News : ऐन‌ गणपती उत्सवात रेल्वे कोलमडणार! मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Local Train Update : सीएसएमटी-विद्याविहार आणि कुर्ला-वाशी दरम्यान लोकल सेवा विस्कळीत होणार, प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार

मुंबई :- मध्य रेल्वेने रविवारी (31 ऑगस्ट) मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गांवर लोकल सेवा काही काळासाठी बाधित होणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने ब्लॉकचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. Mumbai Local Train News

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक

  • वेळ: सकाळी 10.55 ते दुपारी 03.55 पर्यंत.
  • मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गांवर.

या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल (सकाळी 10.48 ते दुपारी 03.45) डाऊन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. तसेच, घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल (सकाळी 10.19 ते दुपारी 03.52) अप फास्ट लाईनवर वळवल्या जातील आणि त्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.
हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक

*वेळ: सकाळी 11.10 ते दुपारी 04.10 पर्यंत.

*मार्ग: कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन.

या कालावधीत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या (सकाळी 10.34 ते दुपारी 03.36) आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या (सकाळी 10.17 ते दुपारी 03.47) सर्व लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी, ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या मार्गांवर विशेष उपनगरी गाड्या चालवण्यात येतील. तसेच, हार्बर लाईनच्या प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0