पुणेठाणेमुंबईसातारा

Satara Police News : साताऱ्यात चार DySP अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ API अधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Satara Police Transfer News : जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; कराड, फलटण, दहिवडी, सातारा ग्रामीण येथील अधिकाऱ्यांचा समावेश

सातारा :- सातारा जिल्हा पोलीस Satara Police दलात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल झाले असून, चार पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ सहायक पोलीस निरीक्षकांना (API) पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने त्यांच्यासाठी नवीन जबाबदाऱ्यांचे दार उघडले आहे. Satara Police Transfer News

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली?

या बदली आदेशानुसार, कराड, फलटण, दहिवडी आणि सातारा ग्रामीण येथील पोलीस उपअधीक्षकांचा समावेश आहे.

1.राजश्री पाटील यांची सांगलीतील तुरची प्रशिक्षण केंद्रातून कराड येथे बदली झाली आहे.

2.विशाल खांबे यांची जालन्याहून फलटण उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे.

3.अमोल ठाकूर (कराड) यांची ठाणे शहर येथे पोलीस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे.

4.सोनाली कदम (सातारा ग्रामीण) यांची तुरची, सांगली येथे बदली झाली आहे.

5.अश्विनी शेंडगे (दहिवडी) यांची गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली झाली आहे.

6.राहुल धस (फलटण) यांची नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली आहे.

आठ API अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आठ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळणार आहे. यामुळे त्यांच्या पुढील कारकिर्दीचा मार्ग मोकळा झाला आहे. गृह विभागाने यासंदर्भातील माहिती मागवली असून, पुढील आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पदोन्नती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये रमेश गर्जे (भुईंज), श्याम काळे (सातारा शहर), रवींद्र तेलतुंबडे (पोलीस अधीक्षक वाचक), किरण भोसले (तळबीड), राजेंद्र चौधरी (आर्थिक गुन्हे), ज्ञानेश्वर धनवे (अपर पोलीस अधीक्षक वाचक), अविनाश मते (औंध) आणि नितीन नम यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण 361 सहायक पोलीस निरीक्षकांना ही पदोन्नती मिळणार असून, त्यानंतर त्यांची राज्यभरात विविध ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0