सातारा

Satara News : आधी प्रेयसीला भेटायला बोलावले मग तिला इमारतीतून ढकलले, तिचा मृत्यू

•Satara Crime News साताऱ्यातील कराडमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्याने प्रेयसीला टेरेसवरून फेकल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला.

सातारा :- कराड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला उंच इमारतीवरून खाली फेकले. त्यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला. आरुषी सिंग असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळ बिहारमधील मुजफ्फरपूर येथील रहिवासी होती. ध्रुव चिक्कार असे आरोपीचे नाव असून तो हरियाणातील सोनीपतचा रहिवासी आहे. दोघे कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होते.आरुषी सिंग आणि ध्रुव चिक्कार दोघेही दिल्लीत एकत्र शिकायचे आणि तेव्हापासून ते मित्र होते. वैद्यकीय महाविद्यालयात शिकण्यासाठी दोघांनी एकाच वेळी कराडच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

ध्रुव चिक्कार हा कराडच्या मेडिकल कॉलेजजवळील इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. बुधवारी ध्रुवने त्याची गर्लफ्रेंड आरुषी सिंग हिला त्याच्या फ्लॅटमध्ये भेटायला बोलावले. प्रियकर ध्रुवला संशय होता की, त्याची गर्लफ्रेंड आरुषी हिचे दुसऱ्या मुलासोबतही संबंध आहेत. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. इतकंच नाही तर दोघांमध्ये भांडण झालं, त्यात दोघेही जखमी झाले. यादरम्यान ध्रुवने आरुषी सिंगला इमारतीवरून खाली फेकले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मारामारीदरम्यान आरोपी ध्रुव चिक्कार हाही जखमी झाला असून त्याच्या पायालाही दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत आरुषी सिंगची आई रात्री उशिरा कराडला पोहोचली आहे. पोलिसांनी आरोपी ध्रुव चिक्कारविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0