•घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; टेबल पॉईंटवरील अपघात पुन्हा ऐरणीवर
सातारा | सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ टेबल पॉईंट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, एक युवक आपल्या कारने स्टंट करताना दिसतो. मात्र काही क्षणांतच कारवरील त्याचा ताबा सुटतो आणि ती थेट सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळते. या अपघातात चालक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे. “टेबल पॉईंटवर कोणतीही सुरक्षारेलिंग नाही, ना कोणताही दक्षतेचा इशारा दिलेला आहे. आधीही आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या होत्या, पण कुठलीही कारवाई झालेली नाही,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
टेबल पॉईंट हे सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्य आणि उंच पठारावरून दिसणारे नजारे पर्यटकांना भुरळ घालतात. विशेषतः तरुणाई रील्ससाठी मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करत असते. मात्र, सुरक्षेच्या प्राथमिक सुविधा नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल दरीत कोसळलेल्या कारमधून युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल काही तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…