सातारा

Satara Loksabha Election 2024 : छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेचे उमेदवार जाहीर

•Satara Loksabha Election 2024 | Udayanraje Bhosale उदयनराजे भोसले भाजपकडून.. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे अशी लढत पाहायला मिळणार

सातारा :- राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर छत्रपती उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्षाने चार नावांची घोषणा केली. यामध्ये पंजाब राज्यातील तीन तर महाराष्ट्रातील एका नावाचा समावेश आहे. यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातून आपणच महायुतीचे उमेदवार असेल, असा दावा देखील त्यांनी केला होता. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी मंगळवारी 12 यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे त्यात आहे. उदयनराजे भोसले आता 18 एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता. भाजपकडून बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले.

सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये आता उदयनराजे भोसले यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासोबत होणार आहे. शशिकांत शिंदे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील विद्यमान खासदार देखील शरद पवार गटाचे असून त्यांनी यावेळी आरोग्याचे कारण देत निवडणुकीत उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे शरद पवार गटाच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरीकडे साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा सोडत नव्हता. तसेच शिवसेनाही आक्रमक होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव तयारी सुरु केली होती. त्यांनी सोशल मीडियावर ‘आता नाही, तर कधीच नाही’ असा स्टेटस ठेवले होते. यामुळे भाजपने कळजी घेऊन शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0