Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
Abhijit Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहे, साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणुकीच्या रणांगणात
सातारा :- बिग बॉस फेम अशी ओळख असलेले अभिजीत बिचुकले Abhijit Bichukale आता लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election रिंगणात उतरणार आहेत. सातारा लोकसभा Satara Lok Sabha Election मतदारसंघातील निवडणुकीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 19 एप्रिल रोजी मी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारस म्हणून मतदारांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन बिचुकले यांनी मतदारांना केले आहे. इतकेच नाही तर उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांना उमेदवारी देण्यासाठी भाजपने एवढा वेळ का लावला? याचे आत्मपरीक्षण उदयनराजे यांनी करावे, असे म्हणत बिचुकले यांनी उदयनराजे यांच्यावर देखील टीका केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Update
अभिजीत बिचुकले हे कायमच चर्चेत राहण्यासाठी काहीतरी वेगळे करत असतात. यातच आला त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 19 एप्रिल रोजी सातारा लोकसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडून आल्यानंतर आपण अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी सांगितला आहे. या स्मारकाचे पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. मात्र, स्मारकाची एक विटही अद्याप रचली गेली नसल्याची टीका बिचुकले यांनी केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Update
साताऱ्यात लोकसभेची अतितटीची लढत
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील या मतदारसंघांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. त्यातच आता अभिजीत बिचुकले यांनी देखील या मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. Maharashtra Lok Sabha Election Update