Satara Doctor Suicide Case :‘माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर ताकदीचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करतात’; वर्षा-हर्षा हगवणे प्रकरणाचा दिला दाखला
पुणे :- फलटण येथील महिला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत, या प्रकरणात भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचेही नाव घेतले जात असून, निंबाळकर यांनाही चौकशीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी केली आहे. तसेच, तपासाची कक्षा वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Satara Doctor Suicide Case Latest News
आपल्या बोलण्याला कोणताही आधार नाही, असे सांगितले जात असल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेने आरोग्य विभागाचे वरिष्ठ डॉ. अंशुमन धुमाळ यांना लिहिलेली पत्रे पुरावे म्हणून सादर केली. या पत्रांच्या आधारावर त्यांनी डॉ. अंशुमन धुमाळ, खासदारांचे दोन पीए, एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली.
खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप
रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा गैरवापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. अनेक गुन्हे त्यांच्या प्रभावाखालीच दाखल होतात, असेही त्या म्हणाल्या. या आरोपांना बळ देण्यासाठी अंधारे यांनी वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणाचा दाखला दिला. या दोघींनीही आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख होता, असा दावा अंधारे यांनी केला आणि ती सुसाईड नोट वाचूनही दाखवली.
चाकणकर यांच्यावर टीका
यावेळी अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, महिला आयोगाला मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणताही अधिकार नाही. जर महिलांचा एवढाच पुळका असेल तर वर्षा आणि हर्षा हगवणे यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘चाकणकर यांना भाजपमध्ये उडी मारायची आहे म्हणून हे सगळं चालू आहे का?’ असे विचारत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांना कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा सल्लाही दिला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…