Sassoon Hospital Fraud Case | ससूनमध्ये मोठा घोटाळा : २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Sassoon Hospital Fraud Case
- परस्पर ४ कोटी रुपयांचा अपहार | Sassoon Hospital Fraud Case
पुणे, दि. १६ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी :
Sassoon Hospital Fraud Case
ललित पाटील, ड्रग्स, अग्रवाल पोर्शे अपघात यांसारख्या हायप्रोफाईल गुन्ह्यामध्ये चर्चेत आलेल्या ससून रुग्णालयातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ससून रुग्णालयात कार्यरत सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांकडून तब्बल ४ कोटी १६ लाख रुपयांचा अपहार झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तब्बल २५ जणांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. Sassoon Hospital Fraud Case
याप्रकरणी ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिल्यावरून ससूनचे अकाऊंटंट अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह इतर २३ सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत आढळून आली. याची चौकशी समिती मार्फत करण्यात आली. माने आणि चाबुकस्वार यांना सह्यांचे अधिकार दिले असताना त्यांनी त्याचा गैरवापर केला. अधिष्ठाता यांची मान्यता नसताना त्यांनी ससूनच्या अकाउंट मधून स्वतःच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ४ कोटी १६ लाख रुपये परस्पर जमा केले.
Sassoon Hospital Fraud Case
Sassoon Hospital Fraud Case
Sassoon Hospital Fraud Case