Mira Road Crime News : सराईत मोबाईल चोराला बेड्या काशिगांव पोलिसांच्या गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागाची कारवाई
•गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागाची कारवाई ; घरफोडी, मोबाईल चोरी, जबरी चोरी या गुन्ह्यातील सराईत आरोपीला पोलिसांनी केले अटक
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. काशिगांव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी कामगिरी करत सराईत मोबाईल चोरी करणारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. आरोपीच्या विरोधात चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिगांव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 305,331(2),331(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.यातील फिर्यादी मोहम्मद फैजान फैजाज सिद्धकी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सांगितले की, मित्रासोबत ओम कॉम्प्लेक्स बिल्डिंग,मिरा रोड येथे झोपले असता रात्रीच्या सुमारास कोणी अज्ञात व्यक्तीने आत मध्ये प्रवेश करून त्यांच्यासह त्यांचे मित्र अरबाज, जिजाऊ, जॅकी यांचे मोबाईल फोन चोरीला करून नेल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने वरिष्ठ पोलिसांनी चोरीच्या घटनेबाबत कठोर कारवाई करण्याची निर्देश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस घटनास्थळी जाऊन आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 25 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करून मोबाईल फोन चोरी करणारे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेतले. त्या आरोपीचे नाव दुर्गेश प्रेमचंद्र गुप्ता (रा.मुधर्धाखाडी, साईबाबा मंदीराजवळ, भाईंदर पश्चिम) आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले चार महागडे मोबाईल इतर ठिकाणाहून चोरी केलेले मोबाईल असे एकूण आठ मोबाईल आणि दहा हजार सातशे रुपये जप्त केले आहे.दुर्गेश गुप्ता हा घरफोडी, जबरी चोरी इत्यादी गुन्हे करण्यात सराईत असून त्याच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा अभिलेख पाहिला असता त्याच्या विरुद्ध 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक किरण धगडाणे व पोलिस उप निरीक्षक अभिजीत लांडे, तपासी अंमलदार राहुल वाळुंज हे करत आहे.प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडल 01, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलिस आयुक्त, मिरारोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगांव पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केली आहे.