मुंबई

Mira Bhayandar Crime News : इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्रेत्याला काशीमीरा पोलिसांकडून अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

मीरा-भाईंदरमध्ये प्रतिबंधीत ई-सिगारेटची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-01 काशीमीरा पथकाने प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ई-सिगारेट्स कब्जात बाळगणे, त्यांची विक्री किंवा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत गुन्हे शाखा कक्ष-1 काशीमीरा पथकाला इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, 26 जुलै 2025 रोजी दुपारच्या सुमारास मिरारोड पूर्व येथील कनकिया रोड, बी.एम.सी. ऑफिस रोड, जांगीड एन्क्लेव्ह बिल्डिंगजवळ सापळा रचण्यात आला. या सापळ्यात रेहान सिराज अहमद शेख (रा. बँक रोड, नयनगर, मिरारोड पूर्व) याला ताब्यात घेण्यात आले.

जप्त केलेल्या मुद्देमालात खालील गोष्टींचा समावेश आहे

ELFBAR RAYA D3 BLACK GOLD EDITION 30000 कंपनीच्या 25 नग ई-सिगारेट्स

ELFBAR MOONNIUNT 40 K कंपनीच्या 13 नग ई-सिगारेट्स

YUOTO THANNOS 5000 कंपनीच्या 11 नग ई-सिगारेट्स

THANNOS 5000, ELFBAR RAYA DI कंपनीच्या 35 नग ई-सिगारेट्स

ई-सिगारेट्सच्या वाहतुकीसाठी वापरलेली एक मोटारसायकल

जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 1 लाख 88. लाख रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप सुधाकर शिंदे, गुन्हे शाखा कक्ष-1 काशीमीरा यांनी सरकारतर्फे मिरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिरारोड पोलीस ठाण्यात, ‘प्रोहिबिशन ऑफ ई-सिगारेट्स (प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चर, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट, सेल, डिस्ट्रिब्यूशन, स्टोरेज अँड ॲडव्हर्टायझिंग) कायदा 2019’ च्या कलम 4,5,7,8 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला मिरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशीमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सफौ अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, सुधीर खोत, प्रशांत विसपुते, अश्विन पाटील, सनी सूर्यवंशी, पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे आणि किरण आसवले यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0