•Santosh Deshmukh’s Daughter Secured 85% in HSC मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला बारावीच्या परीक्षेत सायन्स विभागातून 85.33 टक्के मिळाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे यांनी दिल्या शुभेच्छा
बीड :- बारावीच्या निकाल लागल्यानंतर वैभवीने 85.33% टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. त्यानंतर राज्यभरातून वैभवीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही संतोष देशमुखांच्या लेकीला फोन करत बारावी परीक्षा अतिशय चांगले गुण मिळवत उत्तीर्ण केल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अतिशय क्रूर आणि निर्घृणपद्धतीने हत्या करण्यात आली होती. 9 डिसेंबर 2024 रोजीच्या घटनेने संपूर्ण राज्य अन् देश हादरला होता. या हत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आणि सर्व स्थरातून आरोपीला काठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले. वडिलांना न्याय मिळवण्यासाठी वैभवी आणि काका धनंजय यांनी सातत्याने सरकारला जाब विचारत गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी आंदोलन, उपोषण, मूक मोर्चा काढून गुन्हेगारांना तुरुंगात ढकलले आहे. या संपूर्ण घडामोडी मध्ये वैभवी यांनी बारावीच्या सायन्स विभागातून तब्बल 85. 33% पाडले आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वैभवी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचेही आश्वासन यावेळी दिले आहे.
बारावीच्या परीक्षेमध्ये वैभवी देशमुख हिने घवघवीत यश मिळवल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुख हिला फोन केला. तसेच तिचं अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या. तसेच वैभवी हिला खास अभिनंदन पत्रही पाठवले. अंबेजोगाईचे SDO दीपक वाजळे यांनी वैभवी देशमुख हिला प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले पत्र तिच्याकडे सुपुर्द केले.
मुख्यमंत्र्यांचे पत्र..
वैभवी देशमुख हिला पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडिल स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठिवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव सोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव सोबत असेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्राच्या अखेरीस म्हटले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…