क्राईम न्यूजमुंबई
Trending

Santosh Deshmukh Murder : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारची मोठी कारवाई, नवीन SIT स्थापन

Sarpanch Santosh Deshmukh Murder : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी या हत्येच्या तपासासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

मुंबई :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder अपहरण आणि हत्या प्रकरणी फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयीन तपासासोबतच एसआयटीचीही स्थापना करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा याप्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.अनिल गुजर, पोलीस अधिकारी विजयसिंह जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ, चंद्रकांत एस कलकुटे, बाळासाहेब देविदास अग्रहोगे, संतोष भगवानराव गित्ते यांचा नव्या एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. बसवराज तेली या एसआयटीचे प्रमुख असतील.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीवर संतोष देशमुख कुटुंबीयांचा आक्षेप होता. यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला होता.यानंतर आता एसआयटीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली असतील, मात्र काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0