
granddaughter jayashree patil joins bjp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश; फडणवीसांनी वसंतदादांच्या कार्याचे केले कौतुक
मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य आणि दिवंगत माजी राज्यमंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील बुधवारी भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. granddaughter jayashree patil joins bjp विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते.

भाजपमध्ये प्रवेश करताना जयश्री पाटील म्हणाल्या, “काँग्रेसमध्ये मला नेहमीच दुय्यम वागणूक मिळाली. जबाबदाऱ्या देताना अन्याय झाला. जेथे सन्मान मिळत नाही, त्या पक्षात राहण्याचा अर्थच उरत नाही.”
या प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयश्री पाटील यांचे स्वागत करत वसंतदादा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. “वसंतदादांनी शिक्षण, प्रशासन व नेतृत्वाच्या माध्यमातून राज्याच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांची परंपरा मदन पाटील यांनी पुढे नेली आणि आता जयश्री पाटील त्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

जयश्री पाटील या काँग्रेसचे सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील यांची नातेवाईकही आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगलीच्या राजकीय समीकरणात मोठे परिवर्तन होण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून, सांगलीतील भाजपला यामुळे नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.



