छत्रपती संभाजी नगर

Sanjay Shirsat : दिल्लीवारीला पायपुसणी म्हणणारे.. दिल्लीत लोटांगण… आमदार संजय शिरसाट यांचे ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा

•उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार Sanjay Shirsat यांची ठाकरेवर टीका

छत्रपती संभाजीनगर :- शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे आमच्या दिल्लीची पायपुसणी असल्याचा आरोप करणारे आज स्वतःच दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जात असल्याचा गंभीर आरोप संजय शिरसाट‌ यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे काही महिने उरले असताना राजकीय घमसान चालू झाली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप्याच्या चर्चेला जोर धरला असताना त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारीपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मलिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना बैठक येणार असल्याचे संजय राऊत त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणत होते. पण आता तेच दिल्लीत लोटांगण घालण्यासाठी जात आहेत. या प्रकरणी संजय राऊत हे वाढप्याच्या भूमिकेत आहेत. ते कुणाला लोणचे द्यायचे, कुणाला पाणी भरून द्यायचे हे पाहतात. कधीकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागावाटपाच्या चर्चेसाठी येत होते. पण आता ती परिस्थिती राहिली नाही, असे संजय शिरसाट उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.

विशेषतः या दौऱ्यात ते विधानसभेच्या जागावाटपावही काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यातच सुप्रीम कोर्टातील शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणीही बोर्डावर आली आहे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला फार महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago