मुंबई
Trending

Sanjay Shirsat : “मुंबई महापालिका आमच्याच ताब्यात; भगवा पुन्हा फडकेल!” — संजय शिरसाट यांचा विश्वास

Sanjay Shirsat On Mumbai BMC Election : ‘ठाकरेच्या कार्यपद्धतीला कंटाळून’ अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश सुरू

मुंबई :- मुंबई महापालिकेवरील वर्चस्वाची लढाई पेटली असून, आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजपचाच भगवा महापालिकेवर फडकणार, असा ठाम विश्वास शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. Sanjay Shirsat On Mumbai BMC Election “मुंबईचे वाटोळे करणाऱ्याच्या हाती आता ही महानगर राहणार नाही. मुंबई गुजरातमध्ये जाणार, महाराष्ट्रापासून तुटणार — हे वाक्यच आता बाकी आहे,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टोला लगावला.

‘मुंबई गुजरातमध्ये जाणार’ हे वाक्यच उरलेय; ठाकरे गटावर टोला

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटात ‘मोठा भाऊ कोण?’ या चर्चेबाबत शिरसाट म्हणाले, “सर्व्हे अहवालावर फारसा विश्वास ठेवता येत नाही. विधानसभेच्या वेळी 80% सर्व्हे चुकले होते. त्यामुळे मोठा-छोटा भाऊ ठरण्यास अजून वेळ आहे.”

दरम्यान, ‘ठाकरेच्या कार्यपद्धतीला कंटाळून’ अनेक चांगले पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करत असून, ही प्रक्रिया सोमवारपासून अधिक वेग घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमचे टायगर्स पुन्हा मैदानात उतरलेत,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

सामना वृत्तपत्रावरही टीका करत शिरसाट म्हणाले की, “सामनामध्ये जे लिहिलं जातं त्याच्या अगदी उलटच घडतं. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही.”

शेवटी ठाकरे व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर बोलताना, “ही केवळ चर्चा असून, दोघे एकत्र येतीलच याची शाश्वती नाही,” असं स्पष्ट करत, “मुंबई मनपा आमच्या ताब्यात यावी आणि भगवा फडफडावा — हाच आमचा ध्यास आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0