MLA Sanjay Shirsat took charge as CIDCO President आमदार संजय शिरसाट शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक नेते आणि प्रवक्ते
नवी मुंबई :- आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ – सिडको च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे. तसेच, आमदार संजय शिरसाट यांनी आज (गुरुवार,19 सप्टेंबर) अध्यक्ष पदाचा सिडकोच्या मुख्य कार्यालयात पदभार स्वीकारला आहे.
आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat शिवसेना फुटी नंतर मंत्री पदाच्या अव्वल स्थानी होते. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतरही आणि अजित पवार यांची महायुती सरकार मध्ये एन्ट्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले. आगामी विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता महायुतीने नाराज आणि मंत्री पदाचे दावेदार असलेल्या विधानसभा सदस्यांना भेट म्हणून महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. संजय शिरसाट पक्ष फुटी नंतर थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना अंगावर घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय शिरसाट यांना प्रवक्ते पद देऊन पक्षाची भूमिका आणि विरोधकांना उत्तर सडेतोड पणे देण्याची जबाबदारी दिली आहे.
सिडकोच्या घरासंदर्भात आणि विविध योजने संदर्भात संजय शिरसाट काय निर्णय घेणार आहे. सर्वसामान्यांना परवडणारे घरे यातून सर्वसामान्यांना किती फायदा होणार हे पाहावे लागेल.