Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट यांना सिडको महामंडळ राज्य मंत्रीपदाचा दर्जा
Sanjay Shirsat CIDCO Chairman Hemant Patil’s Political Rehabilitation Eknath Shinde government : हेमंत पाटील यांची वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी,माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीही राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई :- शिवसेना बंडखोरीनंतर सर्वात पहिल्या क्रमवारीत असलेल्या नावांपैकी संजय शिरसाट Sanjay Shirsat यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा होती. परंतु बंडखोरीनंतरही मंत्री पदाची जबाबदारी न दिल्याने अनेक वेळा विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर महायुती सरकारने आपल्या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, सरकारने मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी Sanjay Shirsat CIDCO Chairman , तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कापलेल्या हेमंत पाटील यांची वसमत येथील Hemant Patil’s Political Rehabilitation बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सरकारने या दोघांनाही मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.सरकारने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीही राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून संजय शिरसाट यांची मंत्रीपदावर नियुक्ती होणार अशी चर्चा सुरू होती. पण प्रत्येकवेळी त्यांची संधी हुकली. यामुळे संजय शिरसाट यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. त्यांची नाराजी अनेकवेळा स्पष्टपणे दिसली. त्यांनी अनेकदा मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारावर भाष्य करत आपण मंत्रीपदासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले. या प्रकरणी त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी आपण दिलेल्या कथित बलिदानाचेही सूतोवाच केले होते. पण पुढे काहीच झाले नाही.
महायुती सरकारने सोमवारी त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला. यामुळे सरकारने संजय शिरसाट यांची मंत्रीपदाऐवजी मंत्रीपदाच्या दर्जावरच (सिडको अध्यक्ष) बोळवण केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या आर्टिकल ऑफ असोशिएशन मधील आर्टिकल 202 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरुन विधानसभा सदस्य संजय शिरसाट यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको) च्या अध्यक्ष पदावर (मंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना संबंधित पदानुसार सर्व सेवा व सुविधा उपलब्ध असतील, असे सरकारने सोमवारी जारी केलेल्या एका शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.