Sanjay Raut’s Comment : नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली
• Sanjay Raut’s Comment शिवसेना खासदार संजय राऊत यांचे नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जीभ घसरली
अमरावती :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती वानखेडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये वानखेडे यांची लढाई एका ‘नाची’सोबत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नवनीत राणा यांच्यावर टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये संजय राऊत बोलत होते. या वेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली. नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डांसर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला. Sanjay Raut’s Comment
लोकसभा निवडणुकी लढाई देशाची लढाई आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नाची विरोधातील नाही. एका डांसर विरोधातील नाही. एका बबली विरोधातील नाही. तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ही लढाई मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut’s Comment
ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषय अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशा बाईच्या विरोधात शिवसैनिकांनी काम करायला हवे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. Sanjay Raut’s Comment