Sanjay Raut : मंत्रिमंडळ विस्तार मुंबई ऐवजी नागपुरात का होत आहे? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut On Maharashtra Sarkar: संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार करण्याची हिंमत नाही. नागपुरात अधिवेशन आहे. सर्वप्रथम तेथून (नागपूर) मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मुंबई :- मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय जवळपास अंतिम झाला आहे. उद्या रविवारी (15 डिसेंबर) नवीन मंत्री शपथ घेऊ शकतात. हा कार्यक्रम नागपुरात होणार असून, त्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.दरम्यान, मुंबई ऐवजी नागपुरात होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यात नवे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला, पण कोणता विभाग कोणाकडे आहे हे कळत नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माध्यमांची बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुंबईत तसे करण्याची हिंमत नाही. नागपुरात अधिवेशने आहेत.सर्वप्रथम तेथून (नागपूर) मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यापूर्वी त्यांनी ईव्हीएमची मिरवणूक काढावी, असे मला वाटते. पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी आरएसएसच्या मुख्यालयासमोर ईव्हीएमचे मंदिर बांधण्याचा निर्णय घ्यावा.
या राज्यात नवे सरकार स्थापन होऊन एक महिना झाला, तरी कोणता विभाग कोणाकडे आहे, हे कळत नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात रोज खून, बलात्कार होत आहेत, याचे उत्तर मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात अराजकता पसरली आहे, हे सरकार ईव्हीएमचे आहे, त्यांना मेंदू नाही, त्यांच्या मेंदूमध्ये ईव्हीएम आहे.