मुंबईठाणे
Trending

Sanjay Raut : “मुंबईतील कंपन्यांशी करार करायला दावोसला जाण्याची काय गरज?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार; दावोस दौऱ्याला म्हटले ‘पंचतारांकित पिकनिक’

Sanjay Raut On CM Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? राऊतांची एकनाथ शिंदेंवर वैयक्तिक टीका; आकडे फुगवून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष गुंतवणूक दाखवा, असे सरकारला आव्हान

मुंबई l मुंबई महानगरपालिका निवडणुकीत Mumbai BMC Election भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस दौऱ्यावर गेल्याने संजय राऊत यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. “ज्या कंपन्यांचे मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये (BKC) आहे, अशा जेएसडब्ल्यू (JSW) आणि लोढा सारख्या कंपन्यांशी करार करण्यासाठी परदेशात जाणे हे हास्यास्पद आहे. हे काम मुंबईत बसूनही झाले असते, त्यासाठी जनतेच्या कराचा पैसा उधळून परदेशात पिकनिकला जाण्याची काय गरज?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. Maharashtra Political Latest News

गुंतवणुकीच्या आकड्यांवरून सवाल

संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांतील गुंतवणुकीच्या दाव्यांवरही बोट ठेवले. “गेल्या पाच वर्षात 75 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आकडे सांगितले गेले, पण ही गुंतवणूक प्रत्यक्षात कुठे आहे? सरकारने केवळ कागदी आकडे फुगवून जनतेची दिशाभूल करू नये. आतापर्यंतच्या परदेश दौऱ्यांवर झालेला खर्च आणि त्यातून मिळालेली प्रत्यक्ष गुंतवणूक यांचा अहवाल सरकारने मांडवा,” असे आव्हानही त्यांनी दिले.

शिंदे गटावर शरसंधान

मुंबई महापौरपदाच्या निवडीचा संदर्भ देत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. “स्वतःला शिवसेना म्हणवणारे आणि बाळासाहेबांचा फोटो लावणारे आज मुंबईच्या महापौरपदासाठी दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या हयातीत मुंबईचा महापौर मुंबईतूनच ठरत असे, पण आता तो दिल्लीतून ठरणार का?” अशी विचारणा त्यांनी केली. दावोसची ‘पिकनिक’ संपली की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बेरोजगारी आणि प्रत्यक्ष गुंतवणुकीवर लक्ष द्यावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0