Sanjay Raut : राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली त्याला आमचा विरोध नाही ; खासदार संजय राऊत

Sanjay Raut On Raj Thackeray : संजय राऊत यांनी चंद्रकांत दादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर युतीच्या विधानावर देवेंद्र फडणवीस दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर दिले,देवेंद्र फडणवीस यांना मन भावना समजून घेण्यासाठी मन लागते
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा राज ठाकरे Raj Thackeray यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात ईव्हीएम आणि विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात शंका व्यक्त केली. त्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे परंतु त्यांच्या भूमिकेबाबत भविष्यात थोड्या वेळ थांबण्याची भाषा ही संजय राऊत यांनी केली आहे. भाजपाचे आमदाराच्या मुलाच्या विवाह दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट झाली होती. या भेटीवरून राज्यात भाजप शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केल्याने या गोष्टीला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला आहे. त्यावर संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मनातील भावना देवेंद्र फडणवीस यांना मन असं तर समजून घेता येईल असा टोला संजय राऊत त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली आहे, त्याला विरोध करण्यासारखे काहीच नाही. राज्यात विरोधासाठी विरोध करायचा ही भूमिका बदलली पाहिजे. त्यांनी मांडलेल्या ईव्हीएम च्या मुद्द्यांवर आमचा पाठिंबा आहे पण त्यामुळे राजकीय भूमिका बदलते असं नाही. राज ठाकरे भविष्यात काय भूमिका घेणार यासाठी थोडा वेळ थांबवावे लागेल अशी प्रतिक्रिया सर्जेराव त्यांनी राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर दिले आहे.
राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मागील काही दिवसांपासून ठाकरेचे अनेक आमदार पदाधिकारी नेते आमचे संपर्कात असून लवकरच ऑपरेशन टायगर करून बडे नेते ठाकरे ठाकरे गटातून शिंदे गटात येणार असल्याची सांगितले. त्यावर सर्जेराव म्हणाले की, उदय सामंत यांचेच कधी ऑपरेशन होईल सांगता येत नाही. देशात केवळ सत्ता आणि पैसा हेच राजकारण सुरू आहे. तंत्राचा यंत्रणाचा कारवाईची भीती घालून नेते पदाधिकारी फोडून लावायचे, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत असे संजयराव त्यांनी म्हणाले आहे. तसेच रत्नागिरीचे राजन साळवी आणि शिंदे गटात जाणार असल्याचे चर्चांना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की राजेश साळवे यांच्याशी कालच बोललो आहे. पक्ष सोडून जातील असं काही जाणवले नाही. ते अजूनही म्हणतात की बाळासाहेब ठाकरे आणि यांचा शिवसैनिक आहे. माझ्या डोक्यात असं काही विचार नाही. मी आमच्या सहकाऱ्यांना विश्वास ठेवतोय असे ते म्हणाले आहे.