देश-विदेश

Sanjay Raut : पंतप्रधानांना G7 वरून डावललं? – संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sanjay Raut On Government : संसदेच्या विशेष अधिवेशनावरून ‘इंडिया’ आघाडीची बैठक; सलमान खुर्शीद यांच्या पोस्टवरही रोखठोक प्रतिक्रिया

ANI :- राजधानीतील संविधान क्लबमध्ये आज ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. संसद अधिवेशन, G7 परिषदेतील भारताच्या अनुपस्थिती आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्यांवर राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली.

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत राऊत म्हणाले, “आज खास अधिवेशनाबाबत मसुद्यावर चर्चा आहे असं मला सांगितलं गेलं. आमचा पक्ष आधीच या मसुद्यावर सहमती दर्शवून स्वाक्षरी कर चुका आहे. जर विरोधक खास अधिवेशनाची मागणी करत असतील, तर ते व्हायलाच हवं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.” या बैठकीत अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारकडून अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.

सलमान खुर्शीद यांच्या परदेश दौऱ्यावर आधारित पोस्टवर राऊतांनी ठाम भूमिका घेत म्हणाले, “जेव्हा कोणी परदेशात जातं, तेव्हा ते देशाचं प्रतिनिधीत्व करतं, पक्षाचं नव्हे. देशभक्तीची व्याख्या ही कुणी अनुच्छेद 370 च्या समर्थनावर किंवा विरोधावर ठरवू शकत नाही.”

ऑल पार्टी डेलीगेशन संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “मी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, तर मला राष्ट्रविरोधी ठरवलं जातं. पण सत्य हे मांडलंच पाहिजे. आमचं प्रतिनिधीमंडळ अशा देशांतही गेलं आहे, जिथं भारताचे औपचारिक संबंध नव्हते. मला ऐकायला मिळालं की एका प्रतिनिधीनं कार्यक्रमात गाणंही गायलं – यात गांभीर्य कुठे होतं?”

G7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत आक्रमक झाले. “हे पंतप्रधानांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट करावं. जेव्हा तुम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणवता, आणि मग जर निमंत्रणच मिळालं नाही, तर उत्तर द्यायला हवं. भारताची साख इतकी घसरली का? पंतप्रधानांना कोणी विचारत नाही का? हे देशाचं अपमान आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी याचं उत्तर द्यावं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago