Sanjay Raut : वर्षा बंगल्यावरून सुपारी देऊन मातोश्रीवर आंदोलनासाठी पाठवितात ; खासदार संजय राऊत
Sanjay Raut News : सुपर गॅंग चे काही लोक वर्षा बंगल्यावर राहतात तर काही लोक ठाण्यात राहतात
मुंबई :- भगवा सप्ताह जल्लोषात पार पडला. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचं ठाण्यात येताना जागोजागी स्वागत झालं. ठाण्यात झालं. सभागृह भरगच्च होतं. भगवा सप्ताह ज्या पद्धतीने साजरा व्हायला व्हावा तसा तो साजरा झाला. त्यानंतर जो प्रकार झाला. ते दिल्लीच्या अब्दालीचे लोकं होते. अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपारी दिल्या त्यातील एक सुपारी होती, असा घणाघात राऊत यांनी घातला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या तात्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यावर संजय राऊत Sanjay Raut यांनी टीका करत म्हणाले की सुपारीबाज लोकांचे सूत्रधार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान व राहतात तर काही ठाण्यात राहतात असा पलटवार ठाकरे यांचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
वर्षा बंगल्यातून सुपारी गँग चालते आज पत्रकारांसमोर राऊतांनी थेट फोटो दाखवले. आंदोलनात सामील असलेल्या लोकांची नावे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे फोटो दाखवले. तसेच हे सर्व मुख्यमंत्री शिंदे यांचेच लोकं होते. वर्षा बांगला, मंत्रालय आणि ठाण्यात ही सुपारी गँग चालवली जाते. हे सर्व लोकं ठाण्यातील नव्हे तर ठाण्याबाहेरून आणलेले लोकं होते असा दावा राऊतांनी केला आहे.
सुपारी गँगचे सूत्रधार हे दिल्लीत बसलेले यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करणारे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे लोकं होते. यातील काही वर्षा बंगल्यात राहतात, काही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासात राहतात. हे सर्व जण सुपारी गँगचे सदस्य होते. ठाण्यात देखील राडा करणारे याच गँगचे सदस्य आहेत. या सुपारी गँगचे सूत्रधार हे दिल्लीत बसलेले आहेत. अशा प्रकारे भाड्याचे लोकं आणून तमाशा केला जात आहे हे सर्व जनता पाहत आहे”.
हिंमत असेल तर अहमदशाहला धमक्या द्या राऊत यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. बीडमध्ये आंदोलन करणारे हे आमचे कार्यकर्ते नव्हते. धमक्या कोणाला देता. हिंमत असेल तर दिल्लीच्या अहमद शाह अब्दालीला धमकी द्या. जे महाराष्ट्रात लुटत आहेत. मराठी अस्मिता पायाखाली तुडवत आहेत त्यांना आव्हान देण्याची भाषा करा”, असे राऊत म्हणाले.