Sanjay Raut On Bihar Election : निवडणूक आयोग आणि भाजप हातमिळवणी करून ‘राष्ट्रीय कार्य’ करत असल्याचा ठाकरे गटाच्या खासदारांचा थेट आरोप
मुंबई :- बिहार विधानसभा निवडणुकीचे Bihar Election निकाल एनडीएच्या बाजूने स्पष्ट होत असताना, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी निकालांवरून थेट निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यावर गंभीर आरोप करत धक्कादायक ट्वीट केले आहे. राऊत यांनी या निकालाला ‘महाराष्ट्र पॅटर्न’ असे संबोधले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “बिहाराच्या विधानसभा निवडणूक निकालानं धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते!”
ते पुढे म्हणाले, “एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50 च्या आत संपवले!”
बिहार निवडणुकीच्या कलांनुसार, भाजपप्रणित एनडीएने बहुमताचा आकडा पार करत मोठी आघाडी घेतली आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेले नाही. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे भाष्य केले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बिहारच्या निकालाला ‘महाराष्ट्र पॅटर्न’ म्हणत, निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…