Sanjay Raut On Devendra Fadnavis : ‘फडणवीस पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस’; बीसीसीआय आणि उद्योगपतींकडून 2000 कोटींची मदत मागितली
मुंबई :- मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या संकटावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि अजित पवार Ajit Pawar यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘ओला दुष्काळ’ शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही, असे फडणवीस यांनी म्हटल्यानंतर राऊत यांनी त्यांना ‘पेशव्यांच्या काळातील नाना फडणवीस’ अशी उपमा देत हे सरकार ‘गोट्या खेळण्याच्याच लायकीचे’ असल्याची जळजळीत टीका केली.
‘सरकारी भाषा नाही, लोकभावना महत्त्वाची’
राऊत यांनी फडणवीसांच्या ‘ओला दुष्काळ’वरील वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, “सरकार शासकीय शब्दकोशावर नाही, तर लोकभावनेवर चालते. ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा, ही लोकभावना आहे. सरकारने शब्दांचे अर्थ सांगत बसू नये.”
एका शेतकऱ्याने तत्काळ मदतीबद्दल विचारले असता, फडणवीसांनी त्याला “गप बस रे, राजकारण करू नको” असे म्हटले होते. यावर राऊत संताप व्यक्त करत म्हणाले, “ज्या शेतकऱ्याचे सर्वस्व वाहून गेले आहे, तो मदतीबद्दल विचारतोय, यात राजकारण कुठे आहे? तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे!”
अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका
कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवार यांनी “मी इथं गोट्या खेळायला आलो नाही” असे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले की, “ही त्यांची स्टाईल नसून, ही त्यांची मग्रुरी आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठवाड्याचे दुःख कळलेले नाही.”
बीसीसीआय आणि उद्योगपतींकडून निधीची मागणी
मदतीसाठी सरकारकडे पैसा नसल्याचे कारण दिले जात असताना, राऊत यांनी निधीसाठी थेट बीसीसीआय (BCCI) आणि उद्योगपतींकडे बोट दाखवले.
ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्व उद्योगपतींकडून, जे त्यांच्या किंवा भाजपच्या खिशात आहेत, त्यांच्याकडून पैसे जमा करावेत. अमित शाह यांच्या मालकीच्या भारतीय क्रिकेट बोर्डाकडून (BCCI) मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ताबडतोब 2 हजार कोटी रुपये घ्यावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंचा दौरा आता मोर्चा
राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचे कौतुक केले. “उद्धव ठाकरे चिखलात, बांधावर आणि वाहून गेलेल्या घरात जाऊन बसले. त्यांनी लोकांचे दुःख समजून घेतले,” असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या उदासीनतेमुळे 11 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात शिवसेनेचे नियोजित शिबिर रद्द करून, त्याचे रूपांतर मोर्चात करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना “मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये” असे आवाहन केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…