Sanjay Raut : देशाची राजधानी महाराष्ट्रातच हलवतील अशी शक्यता दिसते ; खासदार संजय राऊत यांची मिश्किल टिका
Sanjay Raut Target Amit Shah Mumbai Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांच्या टीका
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार Amit Shah Mumbai Visit आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अमित शहा आणि मोदी यांच्या सततच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मिश्किल शब्दात संजय राऊत यांनी टीका करत म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे देशाची राजधानी महाराष्ट्रात हालु शकतात अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येतात तेव्हा पूर्ण गृहमंत्रालय महाराष्ट्रात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, तेव्हा पूर्ण पीएमओ महाराष्ट्रात येते. त्यामुळे वारंवार विमानाचे इंधन जाळल्यापेक्षा निवडणुका होईपर्यंत ते देशाची राजधानीच महाराष्ट्रात हलवतील, अशी शक्यता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी राज्यात आले की भीती वाटते. त्यांच्या दौऱ्यामध्ये राज्याच्या लुटी संदर्भातला निर्णय होतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर टीका केली.
खोचक शब्दात संजय राऊत राज्य सरकारच्या निर्णयावर टीका
राज्यात सध्याचे सरकार हे बैल पुत्र आहेत. त्यांचे बाप बैल आहेत. अशा खोचक शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. गाईला राज्यमाता केल्यापेक्षा गाईच्या दुधाला भाव द्या, अशी मागणी त्यांनी केली. दिल्लीतून काही बैल येतात, केंद्रातले बैल राज्यात फिरत असतात. त्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील बैल देखील असे निर्णय घेतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. गाईची पूजा आम्ही सर्वच करतो. त्यासाठी शासकीय आदेश काढण्याची गरज नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी जीव दिला. आपला बळी देऊन महाराष्ट्र मिळवला. त्या हुतात्म्याच्या यादीत अदानींचे नाव नाही. या महाराष्ट्रासाठी आमचे पूर्वज लढले आहेत. त्या महाराष्ट्राची जमीन अदानींच्या आणि लोढांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ती तुम्ही गुजराती माणसांच्या घशाच घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा 106 हुतात्म्यांचा अपमान असल्याचा देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या विरोधात आता संयुक्त महाराष्ट्र सारखे आंदोलन उभे राहिला हवे, ही आमची भूमिका असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.