मुंबई

Sanjay Raut : केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मे आहे खासदार संजय राऊत यांची टीका

•अतृप्त आत्मे च्या मुद्द्यावरून लोकसभेच्या प्रचार दरम्यान एकमेकांवर चिखल फेक झाली त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी केंद्र सरकार यांच्यावर निशाणा साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचार दरम्यान अतृप्त आत्मे चा मुद्दा घेत महाराष्ट्राच्या राजकारणात अतृप्त आत्मा आहे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला करत टीका केली होती. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी आता केंद्र सरकारमध्ये दोन अतृप्त आत्मा आहेत.चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोन अतृप्त आत्मे आहेत. आधी त्यांच्या अतृप्त आत्म्याचं समाधान मोदींनी करावं. शरद पवारांनी म्हटलं आहे की भटकती आत्मा कोणाला सोडणार नाही. आता जोपर्यंत नरेंद्र मोदींना पदावरून खाली खेचणार नाहीत, तोपर्यंत आमचा आत्मा शांत राहणार नाही. सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना त्या दोन अतृप्त आत्म्यांची शांती करायला हवी”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

केंद्रीय यंत्रणा मोदी, शहा यांची खरी ताकद पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी आणि आमित शहा इतरांच्या ताकदीला प्रचंड घाबरतात. केंद्रीय यंत्रणा या मोदी-शाहांचा आत्मा आहे, त्यांना बाजूला केल्यास एक मिनिट आमच्यासमोर टिकणार नाहीत. केंद्रीय यंत्रणा या मोदी, शहा यांची खरी ताकद आहेत. ईडी, इन्कमटॅक्स, पोलिस, सीबीआय हा त्यांचा आत्मा आहे. त्यांची ही ताकद काढून घेतल्यावर ते काहीच नाहीत”, असेही राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “काही दिवसांत खेळ सुरू होईल. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ईडी, सीबीआय हे बाजूला सारून मैदानात उतरावे. आमच्यासमोर एक मिनिटही ते टिकणार नाहीत. त्यांच्यासारखे घबराट लोक मी आयुष्यात कधीच पाहिले नाहीत. मोदींनी सर्वात आधी दोन अतृत्प आत्म्यासाठी शांती करायला हवी. मंत्रिमंडळाची निवड झाली, पोर्टफोलिओची वाटणी केली, त्यामुळे एनडीएचे मित्रपक्षातील सगळे आत्मे अतृप्त आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सुपाऱ्या घेऊन पक्ष निर्माण झालेले पक्ष तसेच यावेळी राऊतांनी शिंदे गटासह, अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे. “एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार आहे. मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0