Vasai Cyber Crime News : फसवणुकीचं गुंतागुंतीचं जाळं उघड! सायबर पोलिसांचा चौकस तपास, 12.86 लाखांची रक्कम वाचवली!

Vasai Share Market Trading Fraud News : शेअर ट्रेडिंगच्या अमिषात सापळा – चलाखीने अडवली संशयितांची बँक खाती!
वसई | शेअर मार्केटमध्ये झटपट फायदा मिळवण्याच्या अमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आणखी एक बळी घेतला. Vasai Share Market Fraud मात्र यावेळी सायबर पोलिसांनी गुन्ह्याचे थरारक धागेदोरे शोधत बँक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवत 12 लाख 86 हजारांहून अधिक रक्कम वाचवण्यात यश मिळवलं! Vasai Police Latest News
वसई येथील रहिवासी चौधरी यांना सोशल मीडियावर एका “हाय परताव्याच्या” ऑनलाईन शेअर ट्रेडिंग अॅपची जाहिरात दिसली. सुरुवातीला काही व्यवहार फायदेशीर वाटल्यामुळे त्यांनी गुंतवणूक वाढवत नेली. मात्र काही दिवसांनी, रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती गोठवलेली असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर पोलिसांनी तक्रार दाखल होताच क्षणाचाही विलंब न करता गुन्हा NCCRP पोर्टलवर नोंदवला. अत्यंत जलदगतीने संशयित बँक खात्यांवर नजर ठेवण्यात आली आणि फसवणुकीची रक्कम तात्काळ गोठवण्यात आली.
गुन्हेगारांनी पैसे दुसऱ्या खात्यांमध्ये वळवण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत पोलिसांना मिळाले होते, मात्र बँकेसोबत समन्वय साधून वेळेआधीच त्या हालचालींना अटकाव करण्यात आला.
तक्रारदारास न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगण्यात आलं. पोलिसांनी न्यायालयात गुन्ह्याच्या तपशीलवार मालिका सादर केल्या — पैशांची ट्रान्झॅक्शन पद्धत, गुंतवणुकीच्या लिंक, अॅपमधील व्यवहारांचे स्क्रीनशॉट, बँक खात्यांचे प्रवाह यांचा समावेश असलेला विस्तृत अहवाल देण्यात आला.
या चौकस कामगिरीनंतर न्यायालयाने आदेश दिला आणि अखेर गुंतलेली संपूर्ण रक्कम 12 लाख 86 हजार 390 रूपये तक्रारदाराच्या मूळ खात्यात परत जमा करण्यात आली.

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, राजेश भरकडे सर्व नेम सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.


