महाराष्ट्रमुंबई

Sanjay Raut : शिवसेनेच्या उमेदवाराची पहिली यादी आज दिवसभरात जाहीर होणार संजय राऊत यांची माहिती

Uddhav Thackeray Shivsena Lok Sabha Election Seat : वंचितला चार जागेचा प्रस्तावाला संजय राऊत यांच्याकडून पुनरुच्चार

Sanjay Raut On Lok Sabha Election :- शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी तयार आहे. आज दिवसभरात यादी जाहीर केली जाणार अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच वंचितला आम्ही दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम आहे असेही ते म्हणाले. मातोश्रीवर झाली महत्वपूर्ण बैठक आज प्रसार माध्यमांशी बोलतांना राऊतांनी उमेदवारांची पहिली यादी तयार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, “काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची यादी दिल्लीतून जाहीर होते. सोमवारी शरद पवार, जयंत पाटील यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. तीन पक्षांच्या एकत्र सभा, प्रचार यंत्रणा याबाबत सकारात्मक चर्चा झाली”, असे राऊत म्हणाले.याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. स्वतःचा निर्णय घेण्याची हिंमत आणि अधिकार त्यांच्यात नाही असे राऊत म्हणाले.

आंबेडकर आमच्यासोबत उभे राहतील पुढे ते म्हणाले, “शिवसेनेची पहिली यादी तयार आहे. आज दिवसभरात ती प्रसिद्ध केली जाईल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी जागावाटप पूर्ण केले आहे. वंचित महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक अजूनही आहे. त्यांच्याशीही आमची चर्चा अनेकदा झाली. आजही चर्चा सुरू आहे. त्यांना दिलेला चार जगाचा प्रस्ताव हा कायम आहे. हुकूमशाही विरुद्ध आणि संविधान रक्षणासाठी आंबेडकर आमच्यासोबत ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे”, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केले. Uddhav Thackeray Shivsena Lok Sabha Election Seat

आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हातात काहीच नाही. महाराष्ट्रात पूर्वी मातोश्रीवरच जागावाटपाच्या बैठका होत होत्या. तिथेच निर्णय घेतले जात होते. आता एकनाथ शिंदे, अजित पवार आणि उदयनराजे यांना दिल्लीत जावे लागते. मात्र शाहू महाराजांच्या उमेदवारीचा निर्णय महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घेतला. आम्हाला दिल्लीला जावे लागत नाही. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही. तसेच अजित पवार, एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठा नाही. स्वतःचा निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही”, अशी टीका राऊतांनी केली.

दिल्लीतील गुजराती नेते म्हणत मोदी, शहांवर टीका दरम्यान, नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केल्याच्या चर्चा आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. “जागेसाठी तयारी सर्वच करतात. त्यासाठी जागाही मिळाली पाहिजे. अजित पवार यांच्या हातात ती जागा नाही. कदाचित शरद पवारांनी जागा दिली असती. मात्र आता अजितदादा आणि भुजबळ यांचे दिल्लीतील गुजराती नेते याबाबत निर्णय घेतील”, असे म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे.

रामलीला मैदानावर 31 तारखेला महारॅली आयोजित करण्यात आली आहे. देशभरातून हुकूमशाहीविरोधात आम्ही एकवटणार आहोत. बेकायदेशीर अटका आणि इतर गोष्टी पाहता देशात हुकूमशाहीचे राज्य सुरू आहे हे स्पष्ट आहे. त्याविरोधात आम्ही एकवटणार असून उद्धव ठाकरे, शरद पवार सहभागी होतील”, असे राऊत म्हणाले. Uddhav Thackeray Shivsena Lok Sabha Election Seat

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0