Sanjay Raut : 17 मे महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत होणार… खासदार संजय राऊत यांची माहिती
•शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर चांगलेच ताशेरे ओढले
नाशिक :- 17 तारखेला मुंबईत महाविकास आघाडीची सांगता सभा होणार असल्याची माहिती देखील राऊतांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रद्रोही मोदींच्या मांडीला मांडी लावून बसले राऊतांनी आज राज ठाकरे यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, “काही नेते किंवा काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. सध्या देशात संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातील लोकशाही धोक्यात असल्याने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध हे सर्व धर्माचे- पंथाचे लोक रस्त्यावर उतरू इच्छित आहेत. मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करण्याची जनतेची इच्छा आहे. असे असतानाही राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत”, अशी टीका राऊतांनी केली आहे.
तर बाळासाहेबांचा पवित्रा आत्मा अस्वस्थ झाला असेल राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पनाही न केलेली बरी. ज्या ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्याच कुटुंबातील एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबाच्या वृत्तीने चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्रा आत्मा अस्वस्थ झाला असेल”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
17 तारखेला महाविकास आघाडीची सांगता सभा पुढे संजय राऊत यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुडबुद्धीचीच होती असे राऊत म्हणालेत. तसेच मुंबईत महायुतीची 17 मे रोजी सभा पार पडणार आहे. यावेळी मोदीही उपस्थित राहणार आहेत. यावरून राऊतांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “17 तारखेला मोदी मुंबईत असताना महाविकास आघाडीची देखील सांगता सभा पार पडणार आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी ते स्वीकारले आहे”, अशी माहिती राऊतांनी दिली.
14 तारखेला नाशिक महानगरपालिकेचा घोटाळा बाहेर काढणार ; संजय राऊत
नाशिक महापालिकेत 800 ते 900 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत लवकर आपण सर्व सत्य सांगणार असल्याचे म्हंटले आहे. ते म्हणाले, “नाशिक महानगरपालिकेत नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेला हा घोटाळा आहे. येत्या 14 तारखेला मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व बाहेर काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगरविकास खात्यांनी पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची चांदी कशी केली हे मी संगर आहे. त्यासंदभार्तील कागदपत्रेही सादर करणार आहे”