Sanjay Raut : काँग्रेस आणि आमच्यातली जागावाटपाच्या संदर्भातली चर्चा अद्याप थांबली नाही
•काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार! खासदार Sanjay Raut
मुंबई :- शिवसेना ठाकरे गडाचे नेते खासदार Sanjay Raut यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जागावाटप संदर्भात केलेल्या चर्चेमध्ये म्हणाले की काल दिवसभर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरू होती. या चर्चेला जयंत पाटील आणि आम्ही सहभागी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यातले बरेच स्पेस सुटले आहे शेवटी एकत्र बसून गुंता पुरवण्याची मानसिकता लागते ती आमच्या दोघांमध्ये आहे. तसेच काँग्रेस आणि आमची जागावाटपसंदर्भातली चर्चा थांबलेली नाही. तसेच आज दुपारपर्यंत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आज उद्धव ठाकरे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. असे संजय राऊत म्हणाले आहे.
Sanjay Raut म्हणाले की, राष्ट्रवादी आणि आमच्यात जागा वाटप संपलेलं आहे. आमच्यात फार मतभेद नाहीत. आमच हायकमांड मुंबईत आहे. काँग्रेस-शिवसेनेत काय फायनल होते, ते आज 12.30 वाजेपर्यंत समजेल.
नाना पटोलेंच्या मुद्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजपा एकत्र होते, तेव्हाही जागा वाटपामध्ये अडथळे यायचे. आघाड्या निर्माण होतात, तेव्हा जागावाटपात असे अडथळे येतात. मी नाना पटोले यांच्याबद्दल असे म्हटलेले नाही. माझ्या तोंडी तुम्ही हे वाक्य घालू नका. मी कोणावरही व्यक्तीगत मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, संस्कृतपणा आमच्यात आहे.
Sanjay Raut म्हणाले की, काँग्रेस मोठा राजकीय पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षाने स्थान दिलं पाहिजे. केरळ, कर्नाटक तसच अन्य राज्यात प्रादेशिक पक्षांच्या जोरावर राजकारण सुरु आहे. प्रादेशिक पक्ष नसते, तर मोदी आज पंतप्रधान होऊ शकले नसते. इंडिया आघाडीत सर्वात जास्त प्रादेशिक पक्ष आहेत.