Sanjay Raut : स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीचा निर्णय हा धार्मिक नव्हे तर राजकीय खेळ – राऊतांचा आरोप
Sanjay Raut Latest News : ‘शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे युद्धात मांसाहारी… मग सैनिकांनाही बंदी का नाही?’ संजय राऊत यांचा सवाल
मुंबई :- राज्यातील काही महानगरपालिका क्षेत्रांत 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी मांस आणि मच्छीची दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी बुधवारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन आहे, धार्मिक उत्सव नाही. देशाचे स्वातंत्र्य मोदी, शाह किंवा फडणवीस यांनी दिलेले नाही. मांसाहारबंदीचा हा निर्णय कोणी मागितला? याचे जनक कोण?” असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. Maharashtra Political Latest News
इतक्यावरच न थांबता राऊतांनी ऐतिहासिक संदर्भही दिले. “छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण-भात, तूप खाऊन युद्धावर जात नव्हते. ते मांसाहार करायचे. बाजीराव पेशवेही मांसाहारी होते. सीमेवरील सैनिकांनाही ताकद मिळण्यासाठी मांसाहार आवश्यक असतो. वरण-भात, श्रीखंड खाऊन युद्ध जिंकता येत नाही,” असे ते म्हणाले.
सरकारवर आणखी टिका करताना राऊत म्हणाले, “फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द करत आहात. तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर नका करा, पण राज्याला ‘बंदिशाळा’ बनवू नका. लोकांनी याचा विरोध केला पाहिजे.”
सरकारवर आणखी टिका करताना राऊत म्हणाले, “फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक आणि नामर्द करत आहात. तुम्हाला मांसाहार करायचा नसेल तर नका करा, पण राज्याला ‘बंदिशाळा’ बनवू नका. लोकांनी याचा विरोध केला पाहिजे.”
तसेच, राऊतांनी भाजप नेत्यांवर उपरोधिक वार करताना आरोप केला की, “हेच सरकार रेडे कापून सत्तेत आले. कामाख्या देवी मंदिरात रेडे व बकरे कापले जातात आणि प्रसाद म्हणून खाल्ले जातात. तिथे प्राण्यांचे बलिदान आणि मांसाहार चालतो, मग अचानक हा तिटकारा का?”



