Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे बंधूंच्या युतीचा ठाण्यासाठी ‘वचननामा’ प्रसिद्ध; “15 मिनिटे पोलीस बाजूला करा, मग औकात दाखवतो” – राऊतांचे खुले आव्हान
ठाणे | ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या Thane BMC रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी उच्चांक गाठला आहे. शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात बोचरा आणि वैयक्तिक हल्ला चढवला. “ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या शहराची ओळख आता ‘गद्दारांचे शहर’ आणि ‘ड्रग्जचा अड्डा’ Thane Drug Addaअशी झाली आहे,” अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी ठाणेकरांच्या भावनांना हात घातला.
ठाणे झाले ‘लयारी’, ‘रहमान डकैता’शी तुलना ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना राऊत यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाचा संदर्भ दिला. “ठाणे आता ‘लयारी’ झाले आहे का? चित्रपटात जसा रहमान डकैत असतो, तसाच एक डकैत आज ठाण्यात बसून शहर लुटत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली. ठाण्यातील ड्रग्ज रॅकेटची लिंक साताऱ्यापर्यंत असून, त्यात सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांचा समावेश असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.
पोलीस पॉवर बाजूला करा, मग ठोकून काढू! संजय राऊत यांनी यावेळी थेट युद्धाचीच भाषा वापरली. “आज तुमच्या हातात पोलिसांची ताकद आहे म्हणून तुम्ही रस्त्यावर फिरत आहात. केवळ 15 मिनिटे पोलीस बाजूला करा, मग या गद्दारांना ठाण्याच्या रस्त्यावर कसे ठोकून काढतो ते बघा,” असे खुले आव्हान राऊतांनी दिले. या विधानामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाकरे बंधूंच्या ‘वचननाम्यातून’
विकासाची ग्वाही मुंबईपाठोपाठ ठाण्यातही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती झाली आहे. आज संजय राऊत, राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी संयुक्तपणे ठाण्याचा ‘वचननामा’ प्रसिद्ध केला. “एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही, तर धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे आहे. दिघेंच्या निष्ठेला तडा देणाऱ्यांना ठाणेकर कधीच माफ करणार नाहीत,” असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
२१ तारखेच्या निकालाकडे लक्ष निवडणूक चिन्हाबाबत येणाऱ्या निकालावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, म्हणूनच भीतीपोटी तारीख पुढे ढकलली जात आहे.” आता राऊतांच्या या ‘ड्रग्ज’ आणि ‘डकैत’ या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…