मुंबई

Sanjay Raut : ‘विमानतळाच्या कामात ठाकरेंचा हातभार लागला’; नवी मुंबई विमानतळावरून संजय राऊतांचा भाजप-शिंदे सरकारवर निशाणा

Sanjay Raut On Navi Mumbai Airport : ‘भूमिपुत्रांच्या नावाने गरबा नको, नोकऱ्या हव्या; नाहीतर संघर्ष होईल’,फडणवीसांचे 31 हजार कोटींचे पॅकेज ‘धुळफेक’; ‘पीएमचा भार हलका करण्यासाठी घोषणा’

मुंबई :- नवी मुंबई Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतर आणि भूमिपुत्रांच्या नोकरीच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी भाजप-शिंदे सरकारवर BJP Shivsena Sarkarजोरदार टीका केली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजवरही त्यांनी शंका व्यक्त करत ते ‘धुळफेक’ असल्याचा आरोप केला. Maharashtra Politics Update

नवी मुंबई विमानतळ आणि भूमिपुत्रांचा मुद्दा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, “दीबा पाटील यांच्या नावाला मंजुरी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केलं. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. या कार्यात उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या सरकारचा फार मोठा हातभार लागला याचा मला आनंद आहे.”

विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याचे स्वागत करताना त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली: “मुंबईचं मूळ विमानतळ जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जातं, त्याची ओळख पुसली जाऊ नये, कारण ते छत्रपतींच्या नावाने आहे.”

याचबरोबर, त्यांनी भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा मुद्दा तीव्रपणे मांडला. “मुंबईच्या विमानतळ परिसरात शिवसेनेने भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या. तिथे भूमिपुत्रांचा आवाज राहिला. नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांच्या नावाने केवळ गरबा खेळला जाऊ नये. तिथेही भूमिपुत्रांना सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळाव्या ही आमची मागणी आहे. तसं झालं नाही, तर संघर्ष होईल,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

फडणवीसांच्या पॅकेजवर टीका

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजवर संजय राऊत यांनी थेट टीकास्त्र सोडले. “पंतप्रधानांचा भार हलका करण्यासाठी पंतप्रधान येण्याआधी फडणवीस यांनी पॅकेज घोषित केलं,” असा आरोप त्यांनी केला.

राऊत यांनी प्रश्न विचारला, “पंतप्रधानांना यापेक्षा मोठं पॅकेज घोषित करण्यात काही अडचण नव्हती. फडणवीसांनी 31 हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं, मला त्यांना इतकाच प्रश्न विचारायचा आहे की, सरकारवर 9 लाख कोटींचं कर्ज आहे, मग 31 हजार कोटींची उभारणी कशी करणार?”

पंतप्रधानांनी घोषणा केली असती, तर ते सर्व पैसे केंद्राकडून आले असते. “महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही, कवडी नाही आणि तुम्ही 31 हजार कोटींची घोषणा केली,” अशी टीका त्यांनी केली. कर्जमाफीवर काही बोलला नाहीत. बाकी घोषणा आहेत, पण त्याची अंमलबजावणी कशी होणार याची साशंकता आहे, असे ते म्हणाले.

‘पॅकेज म्हणजे धुळफेक’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी आंदोलन टाळण्यासाठी हे पॅकेज जाहीर केल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. “देवेंद्र फडणवीस यांचं पॅकेज धुळफेक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आल्यानंतर त्यांना कोणी काळे झेंडे दाखवू नयेत, त्यांचा ताफा कोणी अडवू नये यासाठी केलेली ही धुळफेक आहे.”

देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ते म्हणाले, “मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्राचे आहात, भाजपचे नाहीत. आमचेच शब्द का वापरता? जरा नवीन शब्दकोश वापरा.” तसेच, “तिजोरी रिकामी असल्याने अजित पवार यांना झोप लागत नाही,” असा टोलाही राऊत यांनी लगावला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago