“मराठी स्वाभिमानासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत” – संजय राऊत
मुंबई | राज्य सरकारच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या मोर्चात शिवसेना (ठाकरे गट) देखील सहभागी होणार आहे.
शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “मराठी अस्मिता आणि मुंबईच्या संरक्षणासाठी ही वेळ निर्णायक आहे,” असे त्यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले, “पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन लढा दिला होता. आज पुन्हा तसाच प्रसंग ओढवला आहे. मुंबई आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या धोरणांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे.”
या मोर्चासाठी महाविकास आघाडीसह सर्व पक्ष व संघटनांना निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हिंदीच्या सक्तीविरोधात भूमिका घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.
“हा लढा फक्त राजकीय नाही, तर तो मराठी अस्मिता आणि ओळखीचा लढा आहे. म्हणूनच सर्वांनी जोडे बाजूला ठेवून एकत्र यावं,” असे आवाहन राज व उद्धव ठाकरे यांनी सर्व मराठी बांधवांना केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…