Sanjay Raut : आगामी निवडणुकीत ठाकरे 2 सरकार येणार… खासदार संजय राऊत
•आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर Sanjay Raut यांच्याकडून टीका
मुंबई :- विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा ठाकरे सरकार 2 येणार असल्याचे भाकीत खासदार Sanjay Raut यांनी केले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासह आमदार रवी राणा यांच्यावरही टीका केली आहे. आमदार रवी राणा यांनी जर विधानसभेत निकाल चांगला लागला नाही तर दीड हजार रुपये परत घेईल किंवा बंद करेल असा इशारा एका भाषणामध्ये दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.
Sanjay Raut म्हणाले, ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांच्या तारखा मॅनेज करून निवडणुका घेण्यात आल्या, त्याचप्रमाणे आताही तारखा मॅनेज करूनच सत्ताधारी निवडणुका जाहीर करतील. पण विरोधकांमुळे त्यांना निवडणुका वेळेतच घ्याव्या लागतील अन्यथा त्यांची नाचक्की होईल. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. निवडणूक वेळेतच घ्यावी लागेल. इतकेच नाही तर विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात ठाकरे – 2 चेच सरकार येणार आहे”, असे राऊत म्हणाले.
आमदार रवी राणा यांनी नुकतेच महायुतीला मते द्या अन्यथा खात्यातून पैसे काढून घेतले जातील असे विधान केले होते. संजय राऊत यांनी या विधानावरून जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून मतांसाठी आहेत. सत्ताधाऱ्यांच्या भावना किती कलुषित आहेत. हे पैसे त्यांच्या खिशातील आहेत का? पैसे काढून घेणारे हे कोण आहेत? रवी राणा यांच्या पत्नी पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल. येणाऱ्या निवडणुकीत राणा स्वतःही पराभूत होणार आहेत”, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.
अजित पवार यांचा लाडक्या बहिणीच पराभव करणार तसेच “सत्ताधाऱ्यांचे सर्व आमदार, नेते मंत्री हीच भाषा बोलत आहेत की मते न दिल्यास पैसे परत घेऊ. या पैश्यांवर बहिणींचा अधिकार आहे. सरकार पैश्यातून मते विकत घेण्याची सरकारची मानसिकता आहे. आमचे सरकार आल्यास या 1500 रुपयांच्या रकमेत वाढ केली जाईल. अजित पवार यांचा लाडक्या बहिणीच पराभव करणार आहेत. रवी राणा यांनी 1500 मध्ये घर चालवून दाखवावे. गद्दार आमदारांना 50 कोटी, खासदारांना 10 कोटी दिले जातात. मात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात केवळ 1500 रुपये दिले जात आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.