क्राईम न्यूजठाणे
Trending

Thane Crime News : घरफोडी करून चोरी करणारा सराईत आरोपी,मोबाईल चोरही निघाला पोलिसांनी भामट्यांकडून बारा मोबाईल फोन हस्तगत

Thane Latest Crime News : सोन्याचे दागिने, मोबाईल फोन चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना गुन्हे शाखा कक्ष-01 ने केले जेरबंद

ठाणे :- सोन्याचे दागिने, मोबाईल फोन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 Thane Crime Branch अटक केली आहे. तसेच आरोपींकडून पोलिसांनी 12 मोबाईल Mobile Phone Stollen फोन जप्त केले असून मोबाईल फोन ज्या व्यक्तीकडे विक्री करत होते. त्यालाही पोलिसांनी Thane Police Station बेड्या ठोकल्या आहेत. Thane Crime Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा पोलीस ठाण्यात Mumbra Police Station 23 मे 2024 रोजी भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-1 हे करत होते. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांना मिळालेल्या खास बातमीदारामार्फत दोन आरोपी मुंब्राच्या रेतीबंदर परिसरात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांचे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यासंदर्भात कबुली दिली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीमध्ये सहभाग असल्याचे कबुली दिले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल फोन जप्त केले आहे. त्यापैकी तीन मोबाईल फोन हे घरामधून चोरी केल्याचे आरोपींनी कबुली केले आहे. तसेच, अटक आरोपींनी गुन्ह्यातील घरफोडी करून चोरलेले सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन मुस्ताकिम उर्फ गोल्डन चुन्ने खान याला विकत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी खान याला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून एक लाख 47 हजार रुपये किंमतीचे सोन्याच्या अंगठ्या आणि आठ मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. Thane Crime News

अटक आरोपींची नावे

1.मोईन आसिफ शेख,(29 वर्ष) (रा- मुंब्रा बाजारजवळ, शाह नगर मुंब्रा जि. ठाणे)

2.साहील अब्दुल हमीद कुरेशी, (24 वर्ष) (रा कळवा रेतीबंदर चाळ नं. २, मुंब्रा)

3.मुस्तकिम उर्फ गोल्डन चुन्ने खान.

आरोपी शेख याच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल आहे.त्याला न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये जामिनावर सुटका करण्यात आली होती. तसेच दोन्ही आरोपींनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करीत आहेत. Thane Crime News

पोलीस पथक
डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शिवरान पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश शिरसाठ, पोलीस हवालदार दिपक जाधव,नंदकुमार पाटील, अविनाश पाटील, प्रशांत निकुंभ, सुनिल माने,बाळु मुकणे, पोलीस शिपाई ‌ सागर सुरळकर, महिला पोलीस नाईक तेजश्री शेळके सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-1, ठाणे, यांच्या पथकाने केली आहे. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0