Sanjay Raut defamation case : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut Convicted यांना दोषी ठरवले आहे. राऊत यांना 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई :- शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut defamation case यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी (26 सप्टेंबर) माझगाव सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. याशिवाय संजय राऊत यांनाही 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाब्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजारांचा दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. शौचालय प्रकरणात राऊत यांनी मेधा सोमय्या यांचे नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…