Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले ; किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
Sanjay Raut defamation case : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut Convicted यांना दोषी ठरवले आहे. राऊत यांना 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई :- शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut defamation case यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी (26 सप्टेंबर) माझगाव सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. याशिवाय संजय राऊत यांनाही 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाब्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजारांचा दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. शौचालय प्रकरणात राऊत यांनी मेधा सोमय्या यांचे नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता.